[thane] - भारतात बनावट नोटा पाठवण्याचा पाकचा कट

  |   Thanenews

लंडन

नोटाबंदीच्या जवळपास ३ वर्षानंतर पाकिस्तान पुन्हा बनावट नोटांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तान उत्तम गुणवत्ता असलेल्या बनावटांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालीय. बनावट नोटांच्या मदतीने भारतात बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. यामुळेच लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना बनावट नोटा पोहचवल्या जात आहेत.

नेपाळ-बांगलादेशातून भारतात बनावट नोटा

पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात २०१६ पूर्वीच्या आपल्या नेटवर्कद्वारे भारतात बनावट नोटा पाठवण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे यासाठी पाकिस्तान कुटनितीचा दुरुपयोग करतोय. नेपाळ, बांगलादेश आणि इतर देशांच्या माध्यमातून बनावट नोटा भारतात पाठण्याचं काम पाकिस्तान करतोय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आयएसआय बनवतेय बनावट नोटा

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आता उत्तम प्रतीच्या बनावट नोटा बनवत आहे. पूर्वीच्या फोटोकॉपी नोटांच्या तुलनेत या नोटा चांगल्या प्रतीच्या आहेत. यावर्षी मे महिन्यात डी-कंपनीशी संबंधित युनूस अन्सारी याला नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून अटक केली होती. त्याच्यासोबत तीन पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ७६.७ दशलक्ष भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या....

फोटो - http://v.duta.us/tNyA3QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/lUd4mQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬