[thane] - रस्त्यांवरूनच गर्जना
जाहीरसभांसाठी मैदाने नसल्याने प्रचारसभांना पर्याय
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे शहरातील महत्त्वाची मैदाने शांतता क्षेत्रात असून न्यायालयाच्या निर्बंधामुळे जाहीर सभांसाठी काही मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या जाहीर प्रचारसभा रस्त्यांवर होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेच्या समोरील रस्ता सर्वच राजकीय पक्षांकडून सोयीचा भाग म्हणून वापरला जाणार असला तरी यंदा वागळे इस्टेट, ओवळा-माजिवडा भागांतही रस्त्यांवर जाहीर प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरातील मैदानांवरील प्रचारसभांची मोठी परंपरा असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावरील प्रचारसभांकडे कल दिसतो. गावदेवी मैदान आणि शिवाजी मैदान शांतता क्षेत्रामुळे जाहीर सभांसाठी बंद असून सेंट्रल मैदान न्यायालयाच्या निर्बंधामुळे जाहीर सभांसाठी बंद झाले आहे. त्यामुळे जाहीर सभांसाठी प्रत्येक पक्षाला जागा शोधण्याची वेळ आली आहे. रेमण्ड येथील मैदान आणि घोडबंदर रोडवरील काही मैदाने असली तरी ती तुलनेने मोठी असल्याने आणि इतकी गर्दी जमा करणे विधानसभेच्या निवडणुकीसाठी शक्य नसल्याने रस्त्यांवरील जाहीर सभांना पसंती देण्यात येत आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ठाणे महापालिकेच्या समोरील रस्त्यावर जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्या सभा झाल्या होत्या. या भागातील स्थानिक रहिवाशांनाही यामुळे मोठा फटका सहन करावा लागला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता आहे. यंदा प्रत्येक मतदार संघामध्ये सभा घेण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असल्याने मुंब्रा-कळव्यात शरद पवार, वागळे इस्टेटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहे. ठाणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. या सर्व सभा शेवटच्या तीन दिवसांत होणार असल्यामुळे पोलिसांकडे आणि महापालिकेकडे जागांच्या मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/kWeoJAAA