[thane] - विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

कळव्यातील चाळीत लोखंडी शिडीमध्ये महावितरणच्या वीजवाहिनीतून विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे विजेचा धक्का बसून ११ वर्षांची मुलगी आणि ३० वर्षांचा मुलगा मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. दीपशिखा अडसूळ (११) आणि अर्जुन राठोड (३०) अशी मृतांची नावे आहेत.

कळवा पूर्वेतील सम्राट अशोकनगर येथील शिवाजी तलाव परिसरात एका दुकानामध्ये विजेची तार तुटून त्यातून विद्युत प्रवाह लोखंडी शिडीमध्ये प्रवाहित झाला. या लोखंडी शिडीवर ११ वर्षीय दीपशिखा जात असताना तिला मोठा झटका बसला आणि ती शिडीला चिकटली. अपघात पाहणारा अर्जुन या मुलीला सोडवण्यासाठी धावला. परंतु तोही या शिडीला चिकटल्याने जखमी झाला. दोघांनाही कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिकांनी या प्रकऱणी महावितरण कंपनीच्या बेपर्वाईमुळे घटना घडल्याचा आरोप केला आहे. परंतु महावितरणकडून या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/XylTrgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬