[thane] - 'शिक्षण'पुस्तकावर लाल शेरा!

  |   Thanenews

सुशिक्षितांच्या ठाो शहरात सर्वाधिक अल्पशिक्षित उमेदवार

ठाणे : सुशिक्षितांचे शहर, सुजाण मतदारांचे ठाणे अशी बिरुदे मिरविणाऱ्या ठाण्यात विधानसभा निवडणुकीमध्ये अशिक्षित उमेदवार अधिक असल्याची बाब उघड झाली आहे. कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली, ओवळा माजिवडा यांसारख्या सुशिक्षित मतदारसंघातील मतदारांपुढे यंदा सर्वाधिक अल्पशिक्षित उमेदवारांचे पर्याय आहेत. जिल्ह्यात तब्बल ५० उमेदवार अल्पशिक्षित असून ४७ उमेदवारांचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रगतिपुस्तकावर यंदाही लाल शेरा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ज्यांच्या खांद्यावर पुढील पाच वर्षे विकासाची जबाबदारी सोपवायची, तो उमेदवार शिक्षित असावा, ही मतदारांची माफक अपेक्षा यंदाही फोल ठरत आहे. राजकारणात शिक्षणापेक्षाही अनुभव महत्त्वाचा असल्याचा दावा केला जात असला तरी शहराच्या समस्यांचा अभ्यास करत विकासमुद्दे मांडण्यासाठी उमेदवाराचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असते. मात्र ठाण्यातील सुशिक्षित मतदारांच्या नशिबी पुन्हा अल्पशिक्षित उमेदवारच आहेत. ठाणे, कोपरी पाचपाखाडी यांसारखे मतदारसंघ हे जुन्या जाणत्या मतदारांचे म्हणून ओळखले जातात. मात्र याच मतदारसंघात अल्पशिक्षित उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. कोपरीमध्ये १४ पैकी ४ उमेदवार हे अशिक्षित तर ३ उमेदवार अल्पशिक्षित आहेत. या मतदारसंघात एकही उमेदवार उच्चशिक्षित नाही. ओवळा-माजिवडा मतदारसंघात १४ पैकी ४ उमेदवारांना दहावीही उत्तीर्ण करता आली नसून अवघे पाच उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. भिवंडी पूर्व मतदारसंघातही १४ पैकी ४ उमेदवार अशिक्षित म्हणून नोंदविण्यात आले असून ४ उमेदवार दहावी उत्तीर्ण आहेत. १४ पैकी तब्बल ८ उमेदवारांकडून शिक्षणाच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्याची बाब मतदारांकडून नोंदविण्यात येत आहे. उल्हासनगरमध्येही १८ पैकी ४ उमेदवार अशिक्षित तर ५ उमेदवारांनी दहावीचा टप्पा गाठला आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघातही हेच चित्र दिसून येत असल्याने पुढील पाच वर्षातही भिवंडीची स्थिती जैसे थे राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात तब्बल ५० उमेदवारांना दहावीची परीक्षाही उत्तीर्ण करता आलेली नाही, तर ४१ उमेदवार जेमतेम दहावी काठावर पास झाले आहेत, ४७ उमेदवारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून ५४ उमेदवार पदवीधर आहेत. अवघ्या १९ उमेदवारांची नोंद उच्चशिक्षित म्हणून घेण्यात आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/2wMI0QAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬