उदयनराजे भोसले यांच्याकडून मुस्लिम समाजाची माफी

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही, पण तरीही आपण मुस्लिम समाजाची माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतो, जात-पात आपण कधीच मानत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे- बेगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसराची उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. तत्पूर्वी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह कराडच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी माफी मागितली.

कराडच्या सांगता सभेस आपण नव्हतो. आपण असतो, तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यास आपण खाली खेचले असते. आपण कधीच जात-धर्म मानत नाही असे सांगत विक्रम पावसकर यांनी तसे वक्तव्य करायला नको होते, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Karad-Udayan-Raje-Bhosale-apologizes-to-Muslim-community/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Karad-Udayan-Raje-Bhosale-apologizes-to-Muslim-community/

📲 Get Satara News on Whatsapp 💬