मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय बंद; रुग्णांचे हाल

  |   Maharashtranews

दिपाली जगताप पाटील, मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात नुकतीच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र त्याचा फटका सर्वसामान्यांना बसायला लागल्याचं चित्रं स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांसहीत सर्व मंत्र्यांची दालनं बंद झाल्यामुळे सामान्य माणूस प्रशासकीय चक्रव्युहात अडकला आहे. राज्याला मुख्यमंत्रीच नसल्यामुळे किमान सध्याच्या घडीला राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं आहे. परिणामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच बंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मंत्रालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या जनतेची घोर निराशा होत आहे. त्यात सर्वाधिक फटका बसतोय तो गोरगरीब जनतेला. विशेषत: रुग्णांना. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय बंद पडल्याच्या कारणाने गरीब रूग्णांचे हाल होत आहेत. झी २४ तासने अशा काही गरजूंच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नेमकी परिस्थिती समोर आली. 'चार वर्षांच्या साक्षी शिंदेच्या कानांवर केईएम रूग्णालयात शस्त्रक्रिया करायची आहे. ऑक्टोबर महिन्यात साक्षीच्या वडिलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत मदतीसाठी आवाहन केलं होतं. पण आता हे दालनच बंद झालं आहे', ही साक्षीच्या आईवडिलांची व्यथा....

फोटो - http://v.duta.us/y3YzxAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/M4MRDgAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬