शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, संवाद साधत सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच

  |   Maharashtranews

नागपूर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरुच आहे. शिवआघाडीची पहिली बैठक मुंबईत सुरु आहे. सत्तास्थापनेचा तिढा कायम असला तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी पुन्हा एकदा राज्यात दौरा सुरु केला आहे. त्यांनी आज शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांची पाहणी केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी मदतीसह सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच केले आहे. ते नागपूर जिल्ह्यातील अत्यंत दूरस्थ "तीतूर" गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्ज माफीचा विषय छेडला असता शरद पवार यांनी जुनी कर्जमाफी झालीच कुठे, असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांमध्ये आता बँकांचे कर्ज फेडण्याच ताकत उरलेली नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरून बोजा कमी करायचे असेल तर सरकारने थेट बँकेत पैसे भरले पाहिजे आणि त्या पद्धतीने सरसकट कर्ज माफी केली पाहिजे, असे पवार म्हणालेत....

फोटो - http://v.duta.us/9h8_xwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/sQ2AKgAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬