सत्ताधारी भाजपमध्ये महापौर पदावरून अंतर्गत संघर्ष उफाळला

  |   Maharashtranews

कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी-चिंचवड : महापौरपदाच्या सोडतीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे पद महिला खुल्या वर्गासाठी आरक्षित होताच पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर पदासाठी संघर्ष सुरु झालाय. अनेक महिला नगरसेवकांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपसाठी महापौरपदाच्या निवडीची मोठी डोकेदुखी निर्माण झालीय.

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय. सत्ताधारी भाजपमधल्या जवळपास २१ महिला या पदासाठी पात्र आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ महिला नगरसेविकाचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.

अनेक नगरसेवकांच्या समर्थकांनी आगामी महापौर म्हणून समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय. माई ढोरे, झामाबाई बारणे यांची नावे आघाडीला आहेत. सुजाता पालांडे यांचेही नाव या पदासाठी पुढं आलंय. या व्यतिरिक्त काही जण इच्छूक आहेत पण आताच पुढे येऊन पत्ता कट व्हायला नको, या भीतीने या नगरसेविका अजून इच्छा व्यक्त करत नाहीत....

फोटो - http://v.duta.us/2_NtdAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/EDmU5gAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬