आजोबांसह तीन चिमुकल्या वांग नदीत वाहून गेल्याचा थरार

  |   Sataranews

ढेबेवाडी : प्रतिनिधी

नदीचे पात्र ओलांडताना सणबूर (ता. पाटण) येथील तीन चिमुकल्या बहिणींसह आजोबा वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यापैकी आजोबा व दोन मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, एक मुलगी वाहून गेल्याने तिचा शोध सायंकाळी उशरापर्यंत सुरू होता. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ढेबेवाडीनजीक वांग नदीच्या पात्रात ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सणबूर (ता. पाटण) येथील शंकर रामचंद्र साठे (वय 62) हे स्वरांजली आनंदा साठे (10), श्रावणी शिवाजी साठे (10), क्षितिजा शिवाजी साठे (12) या तीन नातींसोबत कुठरे (ता. पाटण) येथे मुलीकडे गेले होते. रात्री मुक्‍काम करून गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ते सणबूरकडे निघाले. यावेळी नदीपात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी ओलांडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन नातींसह शंकर साठे नदीपात्र ओलांडून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहातून वाहून गेले. सुमारे पाचशे मीटर अंतरावर काही स्थानिक नागरिक आंघोळीसाठी तसेच गोधड्या धुण्यासाठी आले होते. त्यावेळी नदीपात्रातून आजोबा वहताना त्यांना दिसून आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Grandpa-carried-away-With-three-sisters-In-the-Wang-River-basin/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Grandpa-carried-away-With-three-sisters-In-the-Wang-River-basin/

📲 Get Satara News on Whatsapp 💬