आशियाई फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान करणार भारताचे प्रतिनिधित्व

  |   Akolanews

अकोला: फुटबॉलचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या अकोला जिल्ह्याला नव्या उमेदीचा खेळाडू गवसला आहे. देशाच्या फुटबॉल क्षेत्रात नावाजलेल्या शेख घराण्यातील चौथ्या पिढीतील हा खेळाडू. या खेळाडूचे नाव सुफीयान शेख. १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत इंडोनेशिया येथे आयोजित आशियाई फुटबॉल स्पर्धेत सुफीयान १८ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय संघात सुफीयान महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे, हे येथे उल्लेखनीय.

सुफीयान १६ वर्षांचा आहे. सुफीयानचे आजोबा शेख चांद हे अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी खेळाडू आहेत. वडील फईम शेख महाराष्ट्र पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. सुफीयानला बालपणापासून फुटबॉलचे वेड आहे. अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर सुफीयान खेळायचा. अलीकडे सुफीयानने राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत स्वर्णिम कामगिरी केली. अनेक चषक आणि अनेक पदके महाराष्ट्राच्या झोळीत सुफीयानने टाकली. सुफीयान सध्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे शिक्षण घेत आहे. तसेच कोल्हापूर पोलीस दल १७ वर्षांखालील संघाचेदेखील अनेक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सुफीयानचा फुटबॉल आलेख उंचावत आहे. आजोबा शेख चांद, विदर्भ केसरी नजीर पहिलवान, वडील अब्दुल फईम, क्रीडा संघटक सय्यद जावेद अली यांचे मार्गदर्शन सुफीयानला लाभत असते....

फोटो - http://v.duta.us/QmiYAAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/nJTuPgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬