'इफ्फी'त रेट्रोस्पेक्टिव्ह ऑफ इंडियन न्यू वेव्ह सिनेमा

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

सुवर्ण महोत्सवी इफ्फीत यंदा इंडियन न्यू वेव्ह सिनेमा या विभागासाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे. या विभागात भारतात 1950 ते 1970 या कालावधीत तयार झालेले विशिष्ट कथा व शैलीचे बारा सिनेमे प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागाची सुरूवात प्रभावी चित्रपट निर्माते रित्विक घाटक यांच्या 'अजंत्रिक' (द पथेटिक फॅलन्सी) आणि 'मेघे धाका तारा' (द क्लाउड-कॅप्ड स्टार) या चित्रपटांनी होईल.

न्यू वेव्ह सिनेमात महत्वाचा वाटा असलेले चित्रपट निर्माते मृणाल सेन यांचा 'भुवन शोम' हा चित्रपटदेखील प्रदर्शित केला जाणार आहे. या विभागात मनी कौल यांचा 'उसकी रोटी' व 'दुविधा', अदूर गोपालकृष्णन यांचा 'स्वयंवरम', कुमार सहानी यांचा 'माया दर्पण', श्याम बेनेगल यांचा 'अंकुर' व 'द रोल', जी अरविंदन यांचा 'उत्तरायणम' व 'थंपु' (द सर्कस टेंट) आणि जॉन अब्राहिम यांचा 'अग्रहराथील कझुथै' (डाँकी इन ए ब्राम्हण व्हिलेज) हे चित्रपट दाखविण्यात येतील....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Retrospective-of-Indian-New-Wave-Cinema-in-iffi-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Retrospective-of-Indian-New-Wave-Cinema-in-iffi-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬