उशिरा येणार्‍या गुरुजींवर आता कारवाईचा दंडुका

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये बहुतांश शिक्षक उशिरा येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या लेटलतिफ शिक्षकांवर आता कारवाई होणार असून यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय शिक्षण व क्रीडा समितीच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस सदस्य अरूण गोरे, शिवाजी चव्हाण, प्रदिप पाटील, मंगेश धुमाळ,सौ. विनिता पलंगे, सौ. रूपाली राजपुरे,विजय पवार, नवनाथ भरगुडे,शंकर देवरे, रूपेश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी एच.व्ही.जाधव, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश प्राथमिक शाळेतील शिक्षक उशिरा येत असल्याच्या तक्रारी झेडपी सदस्यांसह ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत यापुढे शाळांमध्ये उशिरा येणार्‍या शिक्षकांची चौकशी करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याच्या सूचना राजेश पवार यांनी सर्वच गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या. या लेटलतीफ शिक्षकांची चौकशी लावून जे दोषी शिक्षक आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राजेश पवार यांनी सांगितले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Action-now-on-teachers-coming-late-to-Satara-Zilla-Parishad/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Action-now-on-teachers-coming-late-to-Satara-Zilla-Parishad/

📲 Get Satara News on Whatsapp 💬