ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ग्रामीण भागातील खेड्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची बाब सामाजिक, आर्थिक सुधारणेशी संबंधित असली तरी ती जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदांनी या जीवन-मरणाच्या मुद्याला हरताळ फासल्याचे चित्र आहे. सर्वच ग्रामीण मार्गांची अवस्था बिकट असताना जिल्हा परिषदांनी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने आॅगस्ट २०१९ मध्ये राज्याचे ग्रामीण रस्ते परिरक्षा धोरण निश्चित केले असतानाही त्याला 'खो' दिला जात आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ते असणे, ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे रस्त्यांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती (परिरक्षा) करणे, यासाठी ग्रामविकास विभागाने धोरण तयार केले आहे. त्या धोरणानुसार कृती आराखडा तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे; मात्र या धोरणानुसार रस्त्यांची देखभाल-दुरुस्तीचा आराखडा अनेक जिल्हा परिषदांनी अद्यापही तयार केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सरत्या पावसाळ्यात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्यानंतरही शासनाच्या धोरणानुसार दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. त्याचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागत आहे. राज्यातील एकूण २ लाख ३ हजार ९९४ किमीच्या रस्ते दुरुस्तीसाठी हे धोरण ठरविण्यात आले आहे....

फोटो - http://v.duta.us/UM8ivQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/pEDMrAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬