तासगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेली द्राक्षबाग शेतकऱ्याने स्वत: तोडली

  |   Sanglinews

मांजर्डे (जि. सांगली) : वार्ताहर

मांजर्डे परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मागील दोन महिन्यांपासून बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. झाडावरील सर्वच हळकुज गळून बाग वाया गेल्यामुळे मांजर्डे (ता.तासगाव) येथील सुभाष मोहिते यांनी आपली बाग तोडली आहे.

मांजर्डे येथे सुभाष मोहिते यांची आरवडे रोडला १ एकर थामसन वाणाची द्राक्षबाग आहे. बागेची छाटणीनंतर झाडांवर सरासरी ७० ते ८० घड आले होते. मागील दोन महिन्यांपासून या भागात सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे बागेत सर्वत्र पाणी साचले होते. द्राक्ष बागेची छाटणी नंतर झालेल्या मुसळधार पाऊसाने सर्व घड कुजले, सर्व बागेत आलेल्या दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली आहे. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-cut-down-the-vineyard-affected-by-heavy-rains-two-lakh-loss/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-cut-down-the-vineyard-affected-by-heavy-rains-two-lakh-loss/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬