नारायण राणे सारख्यांच्या राजकारणी लोकांचे दिवस आता संपले आहेत; विनायक राऊतांची बोचरी टीका

  |   Sanglinews

विटा : प्रतिनिधी

नारायण राणे सारख्यांच्या राजकारणी लोकांचे दिवस आता संपले आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला. राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेवर टीका केली होती. त्‍याचा समाचार घेताना राऊत यांनी राणेंवर टीका केली.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊन वीस दिवस उलटून गेले, तरी राज्यातील भाजपसह चारी प्रमुख पक्षांना सत्ता स्थापन करता आलेली नाही. याबाबत भाजप आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांमध्ये न भूतो न भविष्यती असा सत्तासंघर्ष सुरू झालेला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री आमचाच होईल आणि सत्ता आमचीच येईल असे जाहीर केली होती. त्‍यानंतरही अद्याप सरकार स्‍थापनेची अनिश्चितता कायम आहे.

त्यातच सुरूवातीला आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे सांगणाऱ्या भाजपने 105 आमदारांसह सत्तास्थापनेसाठीची 145 ही मॅजिक फिगर पूर्ण करू असे संकेत दिले आहेत. शिवाय भाजपात नव्याने प्रवेश केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोकणातील नेते नारायण राणे यांनी मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू करा असे आदेश दिल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. यावर टिप्पणी करताना कोकणातलेच राणे यांचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेना नेते खासदार विनायक राऊत म्हणाले राज्यात महाशिव आघाडीचेच सरकार येणार असून, लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Narayan-Rane-Political-career-end-say-Shivsena-MP-Vinayak-Raut-at-Vita-in-sangali/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Narayan-Rane-Political-career-end-say-Shivsena-MP-Vinayak-Raut-at-Vita-in-sangali/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬