पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!

  |   Akolanews

पातूर: पातूर शहराच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीच्या वाशिम येथील भरारी पथकाने गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकून,वीज मीटरमधून होणारी वीज चोरी पकडली.

या प्रकरणात वीज चोरी कायदा कलम १३५ नुसार लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशिम येथील भरारी पथकाला पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक मीटरसोबत छेडछाड करून विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने नगराध्यक्ष कोथळकर यांच्या निवासस्थानी छापा टाकून इलेक्ट्रिक वीज मीटरची तपासणी केली. तपासणी दरम्यान पथकासमोर वीज चोरी असल्याचे उघड झाले . नगराध्यक्षांच्या घरी नेमकी किती रुपयांची वीज चोरी झाली, याची माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत गुप्तपणे करण्यात आली. महावितरण कंपनीने यासंदर्भातील तपशील सध्यातरी उघड केलेला नाही. महावितरणच्या भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी एका ढाब्यावरसुद्धा कारवाई केली होती. (तालुका प्रतिनिधी)...

फोटो - http://v.duta.us/bIyaxwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qFM3owAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬