पूरग्रस्तांचा महापालिकेवर मोर्चा

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

पूरग्रस्तांचे वस्तुनिष्ठ नव्याने पंचनामे करून अनुदानाची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी. यासह विविध मागण्यासाठी पूरग्रस्त हक्क व पुनवर्सन संघटनेच्यावतीने गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक पूरग्रस्त कुटुंबाचे दहा हजार रुपये अनुदान खात्यावर जमा झाले नाही. अनेक भागांचा सर्व्हेही झालेला नाही.

शहरातील शांतीनगर, पाटणे गल्ली, भुई गल्ली, तिवारे गल्ली, लाळगे गल्ली, मद्रासी कॉलनी, इंदिरानगर झोपडपट्टी या परिसराचा पूरग्रस्तात समावेश करावा. पुरग्रस्तांचे धान्य चांगल्या दर्जाचे द्यावे, पूरग्रस्तांना मोफत वैद्यकीय मदत व औषधोपचार करण्यात यावेत, शैक्षणिक फी माफ करावी, पूरग्रस्त भागातील ज्येष्ठ नागरिक, विधवा यांना शासकीय पेन्शन द्यावी आदि मागण्या करण्यात आल्या....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Flood-affected-people-march-on-sangli-municipal-corporation/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Flood-affected-people-march-on-sangli-municipal-corporation/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬