बदली करतो सांगून जि.प.मध्ये फसवणूक

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी असलेल्या महिलेला बदली करतो, असे सांगून त्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे संशयिताने मंत्रालयातील महिला अधिकारी हे काम करून देईल, असे सांगून पैसे उकळले आहेत. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शशिकांत साबळे व रावराणी मॅडम (तक्रारदार यांना पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरेश जगन्नाथ भोसले (रा.सन्मतीनगर, फलटण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार महिलेचे सासरे आहेत.

तक्रारदार सुरेश भोसले यांची सून सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीवर कोरेगाव तालुक्यात कामाला आहेत. जून 2014 त्या सासर्‍यासोबत जिल्हा परिषदेच्या विभागात आल्या होत्या. यावेळी शशिकांत साबळे याच्याशी त्यांची ओळख झाली. 'बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर मी बदली करुन देईन', असे संशयिताने दोघांना सांगितले. त्यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर बदली होईल याची खात्री विचारली असता संशयिताने मंत्रालयात रावराणी मॅडम त्याच्या ओळखीच्या असल्याचे सांगितले. संबंधितांमध्ये बोलणे झाल्यानंतर तक्रारदार यांनी संशयिताला दीड लाख रुपये दिले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/case-registered-against-the-two-at-the-police-station-Fraud-case/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/case-registered-against-the-two-at-the-police-station-Fraud-case/

📲 Get Satara News on Whatsapp 💬