मिरज येथे ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

  |   Sanglinews

मिरज : प्रतिनिधी

येथील स्टँड चौकात ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार बाबासाहेब शिवाप्पा शिकारखाने (वय 55, रा. कोगनोळी) यांचा जागीच मृत्यू झाला. आठवडाभरात या चौकात अपघातात दोघांचा बळी गेला आहे.

शिकारखाने गुरुवारी दुपारी कामानिमित्त मिरजेत आले होते. दुचाकी (एमएच 10 एबी 6826) वरून ते कोगनोळीकडे परत जात असताना ट्रक (एमएच 12 आरएन 6090) ने त्यांना ठोकर दिली. ते ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बस स्टँड चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महिनाभर या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेटिंग केले आहे. दोन्ही बाजूंना पोलिसांनी रस्ता दुभाजक देखील केला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/man-s-death-in-truck-accident-in-miraj/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/man-s-death-in-truck-accident-in-miraj/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬