महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे सरळसेवा पदभरती राबवल्या जाणार आहे. त्याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने प्रारंभ केला असून, जानेवारी २०१९ पासून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या तरतुदीचा समावेश करण्यात येईल. बिंदू नामावलीत १३ टक्के मराठा आरक्षण आणि १० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील (खुला प्रवर्ग) आरक्षणाचा समावेश केल्यानंतरच बिंदू नामावली निश्चित करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

महापालिकेची प्रशासकीय गाडी रूळावर आणण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी तांत्रिक व लेखा संवर्गातील ७३५ रिक्त पदांसाठी सरळसेवा पदभरती राबवण्याचे निर्देश ७ नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मनपा प्रशासनाने २००४ पासून बिंदू नामावली अद्ययावत केली नसल्याने अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस.थूल यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे निर्देश आॅगस्ट २०१५ मध्ये महापालिकेला दिले होते. त्यानुषंगाने सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. या विभागाने चार महिन्यांत प्रस्ताव तयार करून २०१६ मध्ये सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. पदोन्नती प्रक्रियेच्या बिंदू नामावलीला मंजुरी मिळाली नसली तरी सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. यादरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय ध्यानात घेऊन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत....

फोटो - http://v.duta.us/VcS7pgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/i990ygAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬