महिला, बाल अत्याचार रोखण्यासाठी मोबाईल अ‍ॅप

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस व स्कॅन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल अत्याचार रोखण्यासाठी महिला व बाल मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. महिला व बाल अत्याचाराला आळा घालण्यासंबंधी त्या अ‍ॅपमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच कायद्यांचीही त्यात माहिती दिली आहे. ते मोबाईल अ‍ॅप लोकांनी डाऊनलोड करून महिला व बाल अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक यांनी केले.

आल्तिनोवरील राखीव पोलिस दलाच्या सभागृहात गोवा पोलिस व स्कॅन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अत्याचार, गुन्हा व कायद्याच्या अनुषंगाने तपासकार्याबाबत पोलिसांना प्रशिक्षण जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बाल लैंगिक अत्याचार विरोधी अ‍ॅपचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग, पोलिस उपमहानिरीक्षक (गुन्हे शाखा) परमादित्या व पोलिस अधीक्षक (गुन्हे शाखा) बॉस्को जॉर्ज व स्कॅन गोवाच्या निमंत्रक ऑदेरी पिंटो व्यासपीठावर होत्या....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Mobile-app-for-women-child-abuse-prevention/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Mobile-app-for-women-child-abuse-prevention/

📲 Get goanews on Whatsapp 💬