'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हेच त्यांच्या डोक्यात' - शरद पवार

  |   Maharashtranews

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होमपिचवर जोरदार बॅटिंग केली. शरद पवार यांनी नागपुरात आज पत्रकारांशी मोकळेपणाने संवाद साधला सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्यांचे एकावर एक फटकारे मारले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेहमीच 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', हेच सुरू असतं, आणि पुन्हा भाजपचंच सरकार येईल असं ते म्हणत असतील, तर ते ज्योतिषशास्त्र देखील पाहतात, म्हणजे भाकीत करतात, हे आपल्याला अजून माहित नव्हतं असा टोला यावेळी शरद पवारांनी लगावला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं कोणतंही वक्तव्य नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी भाजपा आमदारांसोबत बोलताना त्यांनी पुन्हा भाजपचंच सरकार येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर देतांना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांना ज्योतिषशास्त्रातलं ही कळतं, हे मला माहित नव्हतं.

फोटो - http://v.duta.us/RWdT_QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/LhpU7QAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬