येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये होत असलेल्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकांनी तयार केलेल्या कृती आराखड्यात विविध मुद्यांवर बोट ठेवण्यात आले. त्यामध्ये शहरांतील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण, त्यातच रस्त्याच्या बाजूला पादचारी मार्गांचा अभाव असणे, या बाबींवरही उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.

पर्यावरणातील घटकांच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातील हवेचे प्रदूषण घातक पातळीच्या वर जात असल्याचे अहवाल राज्यातील अनेक शहरांतून आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित महापालिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यातील उपाययोजना राबविण्यासाठी संबंधित महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यात प्रदूषणाची कारणे नमूद केली आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी मंडळ व महापालिकांची आहे. अकोला शहरातील प्रदूषणाला रस्त्याच्या कडेलगत असलेली धूळ, वाहनांमध्ये इंधन ज्वलनातून निघणारा धूर, या दोन प्रमुख बाबींमुळे हवेचे प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचते. विशेषत: डिसेंबर, जानेवारी महिन्यात त्यामध्ये प्रचंड वाढ होते....

फोटो - http://v.duta.us/SWj2zgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/QDIjRQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬