रुईघरमधील चौघांची टोळी तडीपार

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणार्‍या चौघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तडीपार केले. संशयित सर्व युवक रुईघर (ता. जावली) येथील असून ते तिशीतले आहेत. दरम्यान, त्यांच्यावरील कारवाईने चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अविनाश चंद्रकांत गोळे (वय 23), किरण चंद्रकांत बेलोशे (25), किशोर शामराव निकम (26), गणेश जनार्दन बेलोशे (22, सर्व रा. रुईघर, ता. जावली) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यातील अविनाश गोळे हा टोळी प्रमुख आहे. संशयितांनी त्यांची टोळी तयार करून घरफोड्या करण्याचे सत्र राबवले होते. पोलिसांनी तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.

मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. संशयितांच्या या कृत्यामुळे समाजात भितीचे वातावरण होते. त्यांच्याकडून भविष्यात हिंसक घटना घडण्याची भिती होती. तसेच चारही संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/gang-of-four-tadipar-by-Superintendent-of-Police-Tejashwi-Satpute/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/gang-of-four-tadipar-by-Superintendent-of-Police-Tejashwi-Satpute/

📲 Get Satara News on Whatsapp 💬