रेंजसाठी ग्राहक स्मशानात, डोंगरावर

  |   Sataranews

येळगांव : आनंदा शेवाळे

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात अवघे जगच कवेत आल्यासारखी परिस्थिती असताना मात्र येळगावचा ग्रामीण भाग मोबाईल रेंजलाही महाग असे म्हणण्याची वेळ येळगांव, येवतीसह संपूर्ण डोंगरी विभागातील जनतेवर आली आहे. येवतीसह परिसरात तर ही गैरसोय अगदी नेहमीचीच होऊन बसली असून स्मशानात, गावाबाहेर मोबाईल रेंज आणि येवती व अन्य लोकवस्ती आऊट ऑफ रेंज अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,आपणच सर्वात कार्यतत्पर अशी टिमकी वाजवणार्‍या आघाडीच्या जवळपास सर्वच मोबाईल कंपन्या या डोंगराळ व दुर्गम भागात मोबाईल रेंजसह किमान आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असून ऑनलाईनच्या जमान्यात हाच खरा अडथळा निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक रेशनिंग पासून जमिनींचे सातबारा उतारे तसेच ऑनलाईन बँकिंगसह सर्वच शासकीय कार्यालयात इंटरनेटची सुविधा ही अत्यावश्यक बाब होऊन बसली आहे.मात्र ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून या सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असून मोबाईल कंपन्यांच्या या बेफिकीर कारभारामुळे मोबाईल धारकांसह सर्वसामान्य जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या मोबाईल अथवा इंटरनेट वापराबाबत शहरी, ग्रामीण असा भेदभावच राहिला नसून सर्वच जण एकाच दराने या सुविधांचा वापर करीत आहे मात्र या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोबाईल कंपन्या शहरी,ग्रामीण असा भेदभाव करत आहेत की काय?असा प्रश्न आता ग्रामीण भागातून विचारला जात आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/customer-In-cemetery-on-the-mountain-For-the-range/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/customer-In-cemetery-on-the-mountain-For-the-range/

📲 Get Satara News on Whatsapp 💬