राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना

  |   Akolanews

अकोला: दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय महासंघाच्या वतीने आयोजित ६५ वी राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाखालील मुले व मुली) बॉक्सिंग स्पर्धेकरिता २६ सदस्यीय महाराष्ट्र संघ गुरुवारी अकोला येथून रवाना झाला. संघामध्ये अकोल्यातील सात बॉक्सरांचा समावेश आहे.

संघामध्ये शेख रेहान ४६ किलो, नाना पिसाळ ४९ किलो, प्रणय राऊत, सोहेल पप्पूवाले ६४ किलो, राज तायडे ६९ किलो, मो. अदनान ८१ किलो (अकोला क्रीडा प्रबोधिनी), श्वेत मोरे ५६ किलो (मुंबई), आकाश गोरवे ६० किलो, उत्कर्ष कोरपे ७५ किलो, इसात लाहोरे ८१ किलो (पुणे), आकाश मोरे (मुंबई), योगिता परदेशी (पुणे), लक्ष्मी काटेल (नािसक), प्राजक्ता शिंदे (पुणे), ऋतुजा कापसे (औरंगाबाद), शुभांगी तोमर (औरंगाबाद), प्रेरणा मस्सी (औरंगाबाद), दीक्षिता लाहोरे, ज्योस्मित रैन (मुंबई), इशिका वरखडे (नागपूर), विधी रावल (अकोला), चीफ आॅफ दि मिशन अक्षय टेंभुर्णीकर, प्रशिक्षक आदित्य मने, कोमल गायकवाड यांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी महाराष्ट्र संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

फोटो - http://v.duta.us/lhjP4QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/EIFqQgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬