विडणीनजीक अपघात; पती ठार, पत्नी गंभीर

  |   Sataranews

विडणी : वार्ताहर

महाड-पंढरपूर महामार्गावर विडणीनजीक राऊ-रामोशी पुलानजीक चारचाकीने दुचाकीस्वारास समोरून जोरदार धडक दिल्याने मोतीराम शंकर शिंदे (वय 45) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी सौ. लता मोतीराम शिंदे या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.

गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास महाड -पंढरपूर मार्गावर विडणीनजीक असणार्‍या राऊरामोशी पुलाजवळ पंढरपूरवरून फलटणच्या दिशेने सोमेश्वरकडे निघालेली हुंदाई कंपनीच्या कारने (क्र. एमएस 42 एस 2530) फलटणवरुन पिंप्रदकडे होंडावरून (क्र . एमएच 11 सीबी 6946) निघालेल्या पती-पत्नी यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. यामध्ये मोतीराम शंकर शिंदे (दहिवडीकर) (वय 45) रा. पिंप्रद, ता. फलटण यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Accident-Near-Vidani-Husband-killed-wife-serious/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Accident-Near-Vidani-Husband-killed-wife-serious/

📲 Get Satara News on Whatsapp 💬