वारणा काठी ऊसउत्पादनात घट

  |   Sanglinews

बागणी : प्रतिनिधी

वारणा काठावर महापूर आणि त्यानंतर सतत सुरू असलेली अतिवृष्टी याचा शेतीला, विशेषत: ऊसपिकाला मोठाच फटका बसला आहे. यावेळी तयार उसाचे या सार्‍या भागात उत्पादन घटण्याचीच भीती आहे. महापूर, अतिवृष्टी पाठोपाठ ऊसउत्पादनातील घटीची भीती यामुळे शेतकर्‍यांची तिहेरी कोंडी झाली आहे. दरम्यान, ऊस कमी असल्याचे यावेळी उसाची पळवापळवी रंगण्याचीच शक्यता आहे. दर जादा मिळेल, अशी ऊसउत्पादकाला आशा आहे.

वारणा भागात प्रामुख्याने राजारामबापूनगर कारखान्याचे साखराळे आणि कारंदवाडी युनिट, विश्वास, सोनहिरा, वारणा, बांबवडे आदी साखर कारखान्यांकडून उसाची उचल केली जाते. तसेच कृष्णा, उदगिरी, सांगली आदी कारखान्यास देखील मोठ्या प्रमाणात ऊस जातो. मात्र या वर्षी झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या सार्‍या भागात वारणा काठी उपसा योजनांचे जाळे आहे. तसेच वैयक्तिक उपसा योजना देखील मोठ्या संख्येने आहेत. बागणी, शिगाव, फार्णेवाडी, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, नागाव, भडकंबे आदी सार्‍या भागात तब्बल 15 हजार एकराहून अधिक उसाचे क्षेत्र आहे. सततचा पाऊस आणि महापुरात बुडाल्याने उसाचे एकरी उत्पादन घटणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Decrease-in-sugarcane-production-in-warana-river-area/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Decrease-in-sugarcane-production-in-warana-river-area/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬