शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

  |   Chandrapurnews

*अवजारे व सापळ्यासह चौघांना अटक

*आरोपींमध्ये वनविभागाचे रोजंदारी चौकीदार

*बल्लारशाह वनपरीक्षेत्रातील घटना

चंद्रपूर,

वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य चांदा वनविभाग अंतर्गत बल्लारशाह परीक्षेत्रातील किन्ही बिटातील कक्ष क्रमांक 569 मध्ये घडली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, यातील दोन आरोपी वनविभागाचे रोजंदारी रोपवन चौकीदार आहेत. त्यांच्यावर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

अटकेतील आरोपींमध्ये दामोधर टेकाम, श्रावण आत्राम, रमेश गेडाम व एकनाथ झाडे सर्व राहणार किन्ही यांचा समावेश आहे. श्रावण आत्राम व एकनाथ झाडे हे वनविभागाचे रोजंदारी रोपवन चौकीदार आहेत.

मध्य चांदा वनविभाग बल्लारशाह परीक्षेत्रातील किन्ही बिटात किन्ही गावातील काही शिकारी टोळीने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी फासे लावले. या फास्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणाचा वनाधिकार्‍यांनी तातडीने पंचनामा केला आणि शिकारी टोळीचा पर्दाफाश करण्यास यश मिळवले. आरोपींकडून वनगुन्ह्यात वापरलेले अवजारे व जाळे जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण 1972 चे कलम 2, 9, 39, 51 अन्वये वनगुन्हा नोंद करून न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी केली.

फोटो - http://v.duta.us/y79ibQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/BD8MvwAA

📲 Get Chandrapurnews on Whatsapp 💬