शेतकऱ्यांनी खचू नये, मी आपल्या पाठीशी ठाम : उद्धव ठाकरे

  |   Sanglinews

कडेगाव : शहर प्रतिनिधी

यावर्षी सर्वत्र सर्वाधिक मुसळधार व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु, शेतकऱ्यांनी खचू नये, घाबरू नये, मी आपल्याला धीर द्यायला आलो आहे. आम्ही आपल्या पाठीशी ठाम आहोत. नुकसान भरपाईसाठी सर्वोत्तपरी मदत करू असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

नेवरी येथील शेतकरी आनंदा किसन शिंदे यांच्या नुकसानग्रस्त टोमॅटो पिकाची पाहणी आणि शिवारातील शेतकऱ्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे सुतोवाच केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेवरी ता. कडेगाव येथे थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने व्यथा मांडली.

यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ विश्वजित कदम, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार अनिल बाबर, आमदार मिलिंद नार्वेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानूगडे-पाटील,प्रांताधिकारी गणेश मरकड ,तहसीलदार डॉ शैलजा पाटील ,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते ,आनंदराव पवार ,शंभूराज काटकर ,युवासेना जिल्हा प्रमुख मिलिंद कदम , तानाजी पाटील ,बजरंग पाटील ,सुभाष मोहिते ,नितीन शिंदे ,संदीप कणसे, सुनील मोहिते ,इंद्रजित साळुंखे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-should-not-hesitate-I-support-you-Uddhav-Thackeray/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Farmers-should-not-hesitate-I-support-you-Uddhav-Thackeray/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬