शासकीस कापूस खरेदी २७ नोव्हेंबरला सुरू होणार!

  |   Akolanews

अकोला : परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून, उताराही घटल्याने खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक बघता, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात ४२ लाख हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यातच खासगी कपाशी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रतिक्ंिवटल ५ हजार ६०० रुपये दर देण्यात आले.परंतु कापूस भिजल्याने व्यापाºयांनी दर कमी केले असून, आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कपाशीची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे....

फोटो - http://v.duta.us/XN5V8gEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/joi5xwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬