शहापूरमध्ये 14 पोती गुटखा जप्‍त

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

शहापूर, ता. सातारा येथे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) छापा टाकला. या कारवाईत आयशर टेंम्पोसह गुटख्याचा एकूण 25 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

राहूल वामन माने (वय 29, रा.शहापूर) असे अटक केेलेल्याचे व पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री शहापूर येथे गुटखा विक्रीचा टेंम्पो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करुन परिसरात छापा टाकला असता एम एच 11 एएल 3653 हा आयशर टेंम्पो निदर्शनास आला. पोलिसांनी त्यामध्ये पाहणी केली असता गुटखा होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता 20 लाख 28 हजाराचा 14 पोती गुटखा होता. टेंम्पोसह पोलिसांनी गुटखा जप्‍त करुन पोलिस ठाण्यात आणला व संशयिताला ताब्यात घेतले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/14-bags-gutkha-seized-in-Shahpur/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/14-bags-gutkha-seized-in-Shahpur/

📲 Get Satara News on Whatsapp 💬