स्कूल बसखाली सापडून पलूसमध्ये बालकाचा मृत्यू

  |   Sanglinews

पलूस : प्रतिनिधी

येथे एका स्कूल बसखाली सापडून कुशवंतसाई वल्लभनेन या सव्वादोन वर्षांच्या बालकाचा गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत कुशवंतसाईची आजी पुष्पावती व्यंकटेशराव वल्लभनेन यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी स्कूल बससह तिचा चालक अविनाश पांडुरंग पाटील याला ताब्यात घेतले आहे.

पलूस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : आशीर्वाद कॉलनीत मूळचे आंध्र प्रदेश येथील वल्लभनेन कुटुंब अनेक वर्षांपासून राहते. त्यांनी त्यांच्या मन्नतसाई या सहा वर्षांच्या मुलासाठी हिराई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. त्या शाळेची स्कूल बस दररोज या मुलाला नेण्या-आणण्यासाठी या ठिकाणी येते.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नातवाला स्कूल बसपर्यंत सोडण्यासाठी पुष्पावती या गेल्या होत्या. त्यांचा लहान नातू कुशवंतसाई हासुद्धा त्यांच्या मागे आला होता. बस सुरू होताना मोठ्या भावाला बघण्यासाठी पुढे सरकलेला कुशवंतसाई बसचालकाच्या बाजूला पुढील चाकाजवळ गेला. काही कळायच्या आतच त्याच्या डोक्यावरून चाक गेले. त्याचा जागीच मृत्यू झाला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/child-s-death-in-school-bus-accident-in-palus/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/child-s-death-in-school-bus-accident-in-palus/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬