सांगलीसह जिल्ह्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ

  |   Sanglinews

सांगली : शशिकांत शिंदे

गेल्या काही दिवसापासून सांगलीसह जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. खून, खुनी हल्ले, मारामारी, दहशत माजवणे, घरफोड्या अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. तर शस्त्रतस्करी जोरात सुरू आहे. रस्त्यावरून चालत जाणार्‍यांचे मोबाईल लंपास होऊ लागल्याने पादचार्‍यांना साधे फिरणेसुद्धा अवघड झाले आहे. दरम्यान, दुसर्‍या बाजूला गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी खबरदारी घेत अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली होती. अनेक गुन्हेगारांना तडीपार केले होते. यातून गुन्हेगारी नियंत्रित येईल, अशी अपेक्षा होती. मात्र उलट वाढ होत आहे.

बंगले आणि फ्लॅट फोडण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. अनेक ठिकाणी दिवसा घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांची अगदी पोलिसांचे घर फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळित रहावी आणि गुन्हेगारांवर वचक रहावा, याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्या पोलिसांच्या वसाहतीमध्येच गेल्या आठवड्यात घरफोडी झाली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/The-problem-of-criminals-is-increasing-in-sangli-district/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/The-problem-of-criminals-is-increasing-in-sangli-district/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬