सातार्‍यातील रस्ते मोकळा श्‍वास घेणार का?

  |   Sataranews

सातारा : विशाल गुजर

सातार्‍यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढू लागली आहेत. राजवाडा, मोती चौक, रविवार पेठ आदि प्रमुख ठिकाणी अतिक्रमणांनी उच्छाद मांडला आहे. मात्र, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याने चालणेही मुश्किल झाले आहे. अतिक्रमणांवर पालिका प्रशासन केव्हा कारवाई करणार? आणि शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार? असा सवाल केला जात आहे. समर्थ मंदिर परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, मोळाचा ओढा, वाढेफाटा रस्ता, गोडोली नाका परिसर यासह शहरातील सर्वच मार्गावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीचा पुरता बट्याबोळ झाला आहे. अगोदरच रस्त्याच्या कामामुळे वाहन चालक त्रस्त झाले असताना अतिक्रमणांच्या विळख्यामुळे समस्येत दिवसेंदिवस आणखी भर पडत चालली आहे. यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार? असे प्रश्‍न सातारकरांना पडले आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/encroachment-Increase-in-Satara/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/encroachment-Increase-in-Satara/

📲 Get Satara News on Whatsapp 💬