सातारा : कर्जमुक्ती देऊन तुमचा सातबारा कोरा करणार आहे, तुम्ही फक्त धीर सोडू नका : उद्धव ठाकरे

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

मी शेतकऱ्यांसाठी येथे आलो आहे. सत्ता जरी स्थापन झाली नसली, तरी शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही. मी कर्जमुक्तीचा शब्द जनतेला दिला होता. तो मी पाळणार आहे. शिवसेना ही शब्द पाळणारी आहे शब्द मोडणारी नाही, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान, सत्ता स्थापनेचा पेच लवकर सुटेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओला दुष्काळ पाहणीसाठी उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर आले आहेत. मायणी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आ. नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, मिलिंद नार्वेकर, शेखर गोरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, धैर्यशील कदम, रणजित भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मी येथे शेतकाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. याची प्रचिती मतदारसंघात आहे. युती असतानाही शेखर गोरे यांना सेनेचे तिकीट दिले होते. त्यांच्यासाठी सभाही घेतली होती. तसेच कर्जमुक्ती देऊन तुमचा सातबारा कोरा करणार आहे. तुम्ही फक्त धीर सोडू नका. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पक्षाच्या वतीने मदत केंद्र सुरु करणार आहे. तुमच्या काही मागण्या आहेत त्या मदत केंद्रात द्या त्या तेथून आल्या नंतर कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना प्रसंगी रस्त्यावर उतरेल. प्रधानमंत्री किसन सनामन निधी शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यावर ठोस पावले उचलणार आहे.

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/shiv-sena-paksh-pramukh-uddhav-thackeray-met-farmers-in-satara-where-he-assured-for-loan-wave/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/shiv-sena-paksh-pramukh-uddhav-thackeray-met-farmers-in-satara-where-he-assured-for-loan-wave/

📲 Get Satara News on Whatsapp 💬