सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्‍पाच्या कार्यालयावर दगडफेक

  |   Sataranews

बामणोली : वार्ताहर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कराड स्थित कार्यालय अंतर्गत कसबे बामणोली (ता. जावली) येथे वनक्षेत्रपाल कार्यालय आहे. या कार्यालयावर गुरुवारी मध्यरात्री रात्री दीड वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सध्या बामणोलीतील बोट चालक व व्याघ्र प्रकल्प कार्यालय यांच्यामध्ये किल्ले वासोटा चेक पोस्टवरून काही मतभेद सुरू आहेत. याचाच गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कार्यालयावर दगडफेक केली. रात्री कार्यालयात रोजंदारी वनमजूर एकटाच आपली रात्रपाळी ड्युटी बजावत होता. यावेळी अचानक हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले.

प्रथम कार्यालयाच्या बाहेर असणारा लाईटचा बल्‍ब फोडण्यात आला. त्यानंतर कार्यालयाच्या समोरील काचेवर दगडफेक करण्यात आली. मात्र ज्या कोणी दगडफेक केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही ही झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी भैरवनाथ बोट क्लबच्या सर्व लॉन्च चालक मालक यांच्या वतीने करण्यात आली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/satara-stone-pelting-at-the-Sahyadri-Tiger-Project-Bamanoli-office/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/satara-stone-pelting-at-the-Sahyadri-Tiger-Project-Bamanoli-office/

📲 Get Satara News on Whatsapp 💬