सम्मेद शिखरजीत रंगला रिंगण सोहळा

  |   Sanglinews

ऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

तीर्थराज सम्मेद शिखरजी येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज मुनीदीक्षा शताब्दी महोत्सवानिमित्त अष्टान्हिक पर्वात सिद्धचक्र महामंडल विधानानिमित्त सन्मती संस्कार मंचच्यावतीने अहिंसा, व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. तर याचवेळी जय जिनेंद्रच्या जयघोषात रिंगण सोहळा अलोट उत्साहात झाला.

आचार्य अनेकांतसागर महाराज, अनुपम सागर, आत्मा सागर, सुदर्शनमती, अवेद्यमती, अजितमती माताजी ससंघ सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटन शांतीधामचे व्यवस्थापक यांनी केले. धर्मानुरागी संतोष दोशी परिवार, शांतीनाथ पाटील परिवार, सुशांत चौगुले परिवार, शकुंतला मिरजे परिवार, वेदांत बुद्रूक परिवार, पद्मश्री पाटील परिवार, एन. एस. पाटील परिवार यांना कलश, शांतीसागर महाराज प्रतिमा, शास्त्र, पंचारती, धर्मध्वजासह रथात बसण्याचा मान मिळाला.

रॅलीमध्ये प्लास्टिक हटाव, झाडे लावा व्यसने सोडा, जय जिनेंद्रच्या जयघोषात आसमंत दुमदुमून निघाला. शांतीसागर महाराज यांची प्रतिमा शिबिरार्थींनी मस्तकावर घेतली होती....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Ringan-Ceremony-celebrate-sammed-shikharji/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Ringan-Ceremony-celebrate-sammed-shikharji/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬