सहापदरीतील कोट्यवधींचा डाव उधळला

  |   Sataranews

सातारा : आदेश खताळ

राष्ट्रीय हमरस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे महितीफलक उभारुन त्याद्वारे राजकीय पक्षांच्या नेत्यांची रंगीत छबी जनतेपुढे आणण्याचा मनसुबा माहिती अधिकाराच्या एका अर्जामुळे उधळला गेला आहे. संबंधित प्रकल्पाची इत्यंभूत माहिती देण्याच्या नावाखाली आखण्यात आलेल्या योजनेतून मोठमोठे होर्डिंग्ज उभे करण्यासाठी कोट्यवधींचे टेंडर काढण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा डाव उधळला गेला. जनतेच्या पैशाने संबंधित सरकार स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी होर्डिंगवर वारेमाप खर्च करत असून त्याला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.

देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर संबंधित मार्गाच्या निर्मितीबाबतची संपूर्ण माहिती देणारे दहा बाय वीस फूट आकाराचे फलक उभारण्याची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची एक योजना होती. प्रत्येक पंचवीस किलोमीटर अंतरावर उभारल्या जाणार्‍या या फलकांवर रस्त्याच्या प्रकल्पाच्या माहितीबरोबरच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रांचाही समावेश केला गेला होता; परंतु माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे अडचणीची ठरु लागल्याने या फलकांच्या उभारणीची योजनाच महामार्ग प्राधिकरणाला गुंडाळावी लागली. कोणत्याही सत्तारुढ पक्षाचा प्रयत्न हा आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विकासकामांची जाहिरातबाजी करण्यावर अधिक असतो. कामाचे श्रेय घेण्यावरुन राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि संयुक्‍त पुरोगामी आघाडीतील (युपीए) सरकारांनी हाच कित्ता आत्तापर्यंत गिरवला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Massive-spending-on-advertising-by-political-leaders/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Massive-spending-on-advertising-by-political-leaders/

📲 Get Satara News on Whatsapp 💬