१०० कोटी खर्चून नवा साखर कारखाना बांधणार

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी 100 कोटी खर्चून आणि सार्वजनिक खासगी भागीदारी' (पीपीपी) तत्त्वावर नवा आधुनिक साखर कारखाना एका वर्षात बांधला जाणार आहे. नवा साखर कारखाना बांधण्यासाठी आणि नवे विकसित तंत्रज्ञान घेण्यासाठी आपण शेजारी राज्यातील दोन आणि एका विदेशी कंपनीची पाहणी केली असून लवकरच सल्लागार कंपनी नेमली जाणार असल्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले.

गावडे म्हणाले की, राज्यातला एकमेव असा संजीवनी साखर कारखाना बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. हा कारखाना वर्षातील फक्त 55 ते 78 दिवसच कार्यरत होता. उर्वरित काळात सदर कारखाना बंद ठेवणे भाग पडत असल्याने तो नुकसानीत जात होता. मात्र, हा कारखाना सुरू ठेवण्यासाठी खर्च कायम येत होता. त्याचा विचार करून आता नवा साखर कारखाना बांधण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून कंत्राटदार ठरल्यानंतर तातडीने बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील ऊस उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची सरकार काळजी घेणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/100-crore-to-build-a-new-sugar-factory-in-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/100-crore-to-build-a-new-sugar-factory-in-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬