[ahmednagar] - नगरमध्ये तपासणी मोहीम कधी?

  |   Ahmednagarnews

जिल्ह्यात खाद्यपदार्थांचे फक्त एक हजार परवाने; एफडीएकडे मनुष्यबळाचा अभाव

म. टा. प्रतिनिधी, नगर

एफडीएने फेब्रुवारी महिन्यात नाशिक शहरात परवाना व नोंदणी प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबवल्यानंतर ती संपूर्ण राज्यात राबवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र, नगरमध्ये ही मोहीम केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. नगर जिल्ह्यातही खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेलांबाबत निश्चित माहिती मिळण्यात अडचणी येतात. मात्र, मोहिमेबाबत बोलण्यास कुणीही तयार नाही, उलट याबाबत काहीही सूचना नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.

नाशिक शहरातील मोहिमेतून शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल किती आहेत, त्यांच्याकडे परवाना किंवा नोंदणी आहे का, किती जणांकडे परवाना नाही, याबाबत माहिती गोळा करण्यात आली. यासाठी मोबाइल अॅपही सुरू करण्यात आले आहे. नाशिक शहरात या पद्धतीने सर्व्हे करण्यात आला. यानंतर एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठकही घेण्यात आली. त्यानुसार संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवण्याचा प्रशासनाचा विचार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/S_TgpwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬