[ahmednagar] - नगरः चारा छावण्यांसाठी जिल्ह्यात ५३४ प्रस्ताव

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी,

चारा छावणी सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यांतून एकूण ५३४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांपैकी परिपूर्ण असणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, चारा छावणीच्या परिपूर्ण प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, पशुधन असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदा अल्प पाऊस पडल्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४२१ गावे दुष्काळी घोषित केली. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली असून, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच राज्य सरकारने २५ जानेवारी रोजी चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार चारा छावणी सुरू करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. या अर्जासोबत छावणी सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार नगर तालुक्यातून ६२, नेवासा २, पारनेर ३९, श्रीगोंदा ६५, कर्जत १२९, जामखेड ८०, पाथर्डी १०३, शेवगाव ४९, राहुरी ४ व संगमनेर एक अशा एकूण दहा तालुक्यांतून ५३४ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत....

फोटो - http://v.duta.us/Hiz7WwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UifZmwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬