[ahmednagar] - नगरः मोफत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील शाळांतील पंचवीस टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारीपासून शाळांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. त्यानंतर शाळानिहाय उपलब्ध असलेल्या जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा राखून ठेवल्या आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे. शाळा प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन आहे. मागील अनुभव पाहता उशीर होऊ नये यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना उशीर झाला आहे. गेल्या वर्षात जानेवारी महिन्यातच प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता मात्र फेब्रुवारी महिन्यात शाळांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. त्यानंतर २५ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर १४ ते १५ मार्च दरम्यान प्रवेशासाठी पहिली सोडत काढली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

फोटो - http://v.duta.us/LwXDtgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iU_Q8AAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬