[ahmednagar] - नेवासेः ग्रामपंचायत निवडणुकीत १४५ उमेदवार रिंगणात

  |   Ahmednagarnews

नेवासे तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ सरपंचपदांसाठी १८ तर ७१ सदस्यपदांसाठी १४५ उमेदवार रिंगणात आहेत. शिरसगाव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य बिनविरोध झाले आहेत.

सरपंचपदासाठी एकूण ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यातील एक अर्ज छाननीमध्ये बाद झाला तर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आठ ग्रामपंचायतींमध्ये १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर सदस्यपदांच्या २२२ उमेदवारी अर्जांतील ९ अर्ज बाद होऊन ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ७१ सदस्यपदांसाठी १४५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आठपैकी सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक दुरंगी होत आहे तर दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. सर्व गावांमध्ये या वेळी प्रथमच जनतेतून सरपंचपद निवडले जाणार आहे....

फोटो - http://v.duta.us/fdxjYwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qQpY0AAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬