[ahmednagar] - प्रॉव्हीडंड फंड भरला नसल्याने गुन्हा दाखल

  |   Ahmednagarnews

सुप्यातील कंपनीविरुद्ध कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नगर

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रॉव्हीडंड फंड (भविष्य निर्वाह निधी) रकमेची कपात केल्यानंतर ती सरकारकडे भरली नसल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीचे येथील प्रवर्तन अधिकारी संतोष बोडखे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुपे औद्योगिक वसाहतीतील साईदीप पॉलिथर्म कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कंपन्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबतचे व्यवहार तपासणारे प्रवर्तन अधिकारी संतोष बोडखे मागील चार वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीच्या नगर येथील जिल्हा कार्यालयात कार्यरत आहेत. श्रम व रोजगार मंत्रालयाच्या ऑनलाइन माहितीनुसार ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सुपा एमआयडीसीतील साईदीप पॉलिथर्म कंपनीचे ऑडिट करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. त्यानुसार १२ फेब्रुवारीला त्यांनी तेथे जाऊन कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधींना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत विचारणा केली व कागदपत्रेही तपासली. या कंपनीत काम करणारे कामगार व कर्मचारी मिळून ३० जणांची २०१८ मधील एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतची भविष्य निर्वाह निधी रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करून सरकारकडे भरली गेली आहे, पण ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या तीन महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीची ८६ हजार ६७२ रुपयांची रक्कम संबंधित कर्मचारी व कामगारांच्या वेतनातून कपात करूनही सरकारकडे भरणा केली नाही. त्यामुळे या कंपनीचे व्यवस्थापन, व्यवस्थापक, संबंधित अकाउंटंट व संचालक दंडपाणी सुब्रह्मण्यम यांच्याविरुद्ध त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1YzUmwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬