[ahmednagar] - महसूल विभागाची वसुली जानेवारीअखेर ५७ टक्के

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये महसूल विभागाला वसुलीचे १४० कोटींचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी या विभागाचे जानेवारीअखेर ५७ टक्के वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. जानेवारीअखेर महसूल विभागाची एकूण वसुली ८१ कोटी ६२ लाख एवढी झाली आहे.

महसूल विभागासाठी यंदा जमीन महसूलचे ५० कोटी, गौण खनिजचे ९२ कोटी असे एकूण १४२ कोटींचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत जमीन महसुलीचे १७ कोटी ७७ लाख रुपये व गौण खनिज करातून ४८ कोटी ३९ लाख रुपये वसुली झाली होती. डिसेंबर महिन्यात महापालिकेची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बहुतांश महसूल विभागाचे अधिकारी अडकले होते. निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर मात्र महसूल विभागाचे वसुलीचे प्रमाण वाढू लागले आहे. जानेवारी महिन्यात जमीन महसुलापोटी सहा कोटी १६ लाख रुपये व गौण खनिज करातून महसूल विभागाची ९ कोटी २८ लाख रुपयांची वसुली झाली. त्यामुळे एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या दहा महिन्यांच्या कालावधीत जमीन महसूल वसुलीपोटी २३ कोटी ९३ लाख रुपये व गौण खनिज करातून ५७ कोटी ६८ लाख रुपये म्हणजेच तब्बल ८१ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ५७ टक्के आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mm4jzAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬