[ahmednagar] - विश्वस्त, पुजाऱ्यांचा पुण्यात मेळावा

  |   Ahmednagarnews

येत्या रविवारी आयोजन; विश्व हिंदू परिषदेचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नगर

मंदिरांची स्वच्छता व पावित्र्य तसेच धार्मिक सेवांसह सुरक्षा व अन्य अनुषंगिक विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच मंदिरे हिंदू समाजाची शक्तीकेंद्रे करण्याच्या हेतूने येत्या रविवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता पुण्यातील मनोहर मंगल कार्यालयात (पटवर्धन बाग, एरंडवणा, मेहंदळे गॅरेज, पुणे) पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांचे विश्वस्त व पुजाऱ्यांचा मेळावा होणार आहे. विश्व हिंदू परिषदेने या मेळाव्याचे नियोजन केले आहे.

मंदिरांशी संबंधित सर्व घटकांचे संघटन करणे, त्यांचे प्रबोधन, प्रशिक्षण तसेच मंदिरांशी संबंधीत समस्यांवर चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय मंदिर प्रबंधक परिषदेचे अध्यक्ष एम. रामाराजू व परिषदेचे केंद्रीय मंत्री अरविंद ब्रह्मभट तसेच पदाधिकारी हरिशंकर, अतुल भोसले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे. मठ-मंदिर संपर्क समिती प्रमुख मनोहर ओक आदी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7x0NmAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬