[aurangabad-maharashtra] - 'अनुलोम' काढणार जिल्ह्यातील २८७ तलावातील गाळ

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत व लोकसभागातून यावर्षीही अनुलोम संस्थेने औरंगाबाद जिल्ह्यातील २८७ तलावातील गाळ काण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यातील १२२ तलावातील गाळ काढण्याच्या कामाबाबत शासनासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

राज्यभरात ही संस्था तब्बल २६०० तलावातील गाळ काढणार असून त्या संदर्भत महाराष्ट्र शासन व अनुलोम संस्था यांच्यात राज्यपातळीवर करार झाला आहे. राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ही संस्था लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे काम करणार आहे. संस्थेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ मोफत काढून देण्यात येणार असून जेसीबी डिझेलचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ गाळ वाहून नेऊन आपल्या शेतात टाकावा लागणार आहे. त्यातून तलावाचे खोलीकरण होऊन मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे तर सुपिक गाळाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादकतेत वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qebpSwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬