[aurangabad-maharashtra] - औरंगाबादः केबल ऑपरेटरांचे आंदोलन मागे

  |   Aurangabad-Maharashtranews

शहरातील केबल ऑपरेटर आणि मुख्य कंट्रोल रूम यांच्यात सुरू असलेला वाद अखेर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) रोजी मिटला. केबल ऑपरेटरकडून मुख्य कंट्रोल रूमकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला असल्याची घोषणा केबल ऑपरेटर असोसीएशनचे अध्यक्ष निशीकांत देशमुख यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पाहणाऱ्या दर्शकांच्या टीव्हीवर ब्लॅक आऊट करण्याचे आंदोलन केबल ऑपरेटरने सुरू केले होते. या आंदोलनामुळे शहरातील ८० हजार केबल टीव्ही पाहणाऱ्या दर्शकांचे टीव्ही बंद होते. याबाबत गुरुवारी हॅथवे एमसीएनचे अधिकारी आणि केबल ऑपरेटर यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हॅथवे केबलने दिलेला ६०-४० चा प्रस्ताव कायम ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव तूर्तास मान्य करण्याचा निर्णय केबल ऑपरेटरने घेतला आहे....

फोटो - http://v.duta.us/MCMcDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2OdEzAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬