[aurangabad-maharashtra] - दुष्काळग्रस्तांचे ८५० अर्ज

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. योजनेसाठी ८५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून २० फेब्रुवारीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार आहे. दानशूर संस्था आणि व्यक्तींची मदत मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पुरेसा निधी उभा राहिल्यास किमान चार महिने योजना सुरू राहणार आहे.

विद्यापीठाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत भोजनासाठी दहा लाख रुपयांची तरतूद केली. सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून जमा झालेली रक्कम आणि विद्यापीठाच्या निधीतून गरजू विद्यार्थ्यांना एक फेब्रुवारीपासून मोफत जेवण देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी साडेआठशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करुन २० फेब्रुवारीला पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपासून मदत मिळणार आहे. आपत्कालीन विद्यार्थी सहायक समितीने खाणावळचालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याचे पैसे थेट खाणावळचालकाला दिले जाणार आहेत. जास्तीचे विद्यार्थी असल्यामुळे रास्त दरात जेवण देण्यास खाणावळचालकांनी तयारी दाखवली आहे. पैसे विद्यार्थ्यांना न देता थेट मेसचालकाला देण्यात येणार आहे....

फोटो - http://v.duta.us/spt2qQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/idG1dgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬